
दापोली दुय्यम निबंधक विभागाला मुद्रांक शुल्कातून कोटींचा महसूल
दापोली दुय्यम निबंधक विभागाकडून मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालखंडात ३५ कोटी २८ लाख ७९ हजार ९६६ रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. यामुळे दुय्यम निबंधक विभागाने १०० टक्के वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश मिळवले आहे.दापोली तालुक्यात सध्या जागा जमिनींचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे-मुंबईतील व्यावसायिकांनी ग्रामीण भागातील जमिनी घेवून हॉटेल, रिसॉर्ट तर काही ठिकाणी प्रकल्प उभारले आहेत. जमीन व्यवहाराच्या नोंदी दुय्यम निबंधक विभागाकडे केल्या जातात. त्यासाठी दस्ताची नोंदणी, मुद्रांक शुल्क आकारले जातात.दुय्यम निबंधक विभागाकडून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये ५७०८ दस्त संख्या असून ४.७८ कोटी रुपयांची नोंदणी करण्यात आली असून ३०.५१ कोटींचा मुद्रांक शुल्क जमा करण्यात आला आहे. www.konkantoday.com