
चिपळूण तालुक्यातील कळकवणेतील समर्थ शिंदेचे युपीएससी परीक्षेत यश
चिपळूण तालुक्यातील कळकवणे गावचे यशस्वी उद्योजक अविनाश शिंदे यांचे सुपुत्र समर्थ अविनाश शिंदे यांनी यीपीएसी परीक्षेत देशात २५५ रँक मिळवून यश मिळवले आहे. युपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये समर्थ शिंदे यांनी यश मिळविल्याचे समजताच दसपटी विभागातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.समर्थ शिंदे हा कळकवणे येथील ज्येष्ठ व्यक्तीमत्व कै. अशोकराव शिंदे यांचा नातू आहे. आजी अश्विनी, वडील उद्योजक अविनाश शिंदे यांच्या प्रेरणेतून समर्थ हा यीपीएससी परीक्षेत यशस्वी ठरला आहे. रत्नागिरीतील फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. यीपीएससीतील यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. www.konkantoday.com




