
भरणे येथे विष प्राशन केल्याने प्रौढाचा मृत्यू
खेड तालुक्यातील भरणे नाका येथे विष प्राशन करून बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या प्रौढाला उपचारादरम्यान मृत्यू झाला. मणीराम थापा (५०, रा. भरणे खेड) असे मृताचे नाव आहे. थापा याला प्रथम उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रूग्णालय व नंतर अधिक उपचारासाठी १०८ रूग्णवाहिकेने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मणीराम थापा याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून विष प्राशन केले होते. यावेळी तो अत्यवस्थ होवून बेशुद्ध अवस्थेत भरणे नाका येथे आढळून आला होता. www.konkantoday.com