
राजकारणात आम्हाला हलक्यात घेवु नका. टांगा पलटी केल्या शिवाय राहणार नाही-मनोज जरांगे पाटील
_लोकसभा निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा नाही. महाराष्ट्रात एकही अपक्ष उमेदवार देखील उभा करणार नाही, ज्यांना ज्या उमेदवाराला पाडायचं त्यांनी त्या उमेदवाराला पाडावं. महाराष्ट्रातील ९२ ते ९३ मतदार संघात मराठ्यांची ताकद आहे.ती कळली पाहीजे. राजकारणात आम्हाला हलक्यात घेवु नका. टांगा पलटी केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. बुधवारी (ता. १०) रघुकुल मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतिने मराठा समाज सवांद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना जरांगे म्हणाले की , देशातल पहिल आंदोलन असेल जे की अचारसंहितेच्या काळात सुद्धा चालु आहे. कोणालाही विरोध करायच म्हणून आंदोलन केल नाही. मागासवर्यीग आयोगाने समाज मागासवर्गीय ठरवला असल्यास ओ.बी.सी प्रवर्गातून आरक्षण द्यायला पाहीजे होते. दहा टक्के आरक्षण देवुन निवडणुका मारुण न्यायच्या होत्या. यापुर्वी त्यांनी हेच केले.१० टक्काचे आरक्षण टिकणार नाही. म्हणुन आम्ही विरोध केला. तर माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं. तेव्हा माञ मी त्यांना सोडल नाही. माझी चौकाशी लावली गेली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आडून हल्ला केला. अंतरवली सराटी येथील आंदोलनाचा मंडप काढण्याचा प्रयत्न केला. विविध गुन्हे दाखल करुण त्यांना राज्यातून तडीपार करायच होत. तडीपार केलम तर दुसर्या राज्यात मराठ्यांना घेवून आंदोलन करेन. www.konkantoday.com