
हातखंबा येथे ओव्हरटेक करणाऱ्या डंपरचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू
मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथे ओव्हरटेक करणाऱ्या डंपरचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी 7.30 वा. घडली.कल्पिता किशोर घडशी (52, रा. नाणीज घडशीवाडी, रत्नागिरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ती दत्ताराम नारायण दरडी (रा. रेल्वेस्टेशन, रत्नागिरी ) याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून नाणीज ते रत्नागिरी येत होती. ते हातखंबा येथील गद्रे पेट्रोल पंपाच्या खालील बाजूस आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना डंपरचा धक्का लागून हा अपघात झाला. यात कल्पिता घडशी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.www.konkantoday.com