
लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील पाच पालख्यांच्या भेटीचा नेत्रदीपक सोहळा पार पडला
_लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील पाच पालख्यांच्या भेटीचा नेत्रदीपक सोहळा हा शनिवारी ३० मार्च रोजी रात्री हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत, प्रतिसादात, ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाबाची उधळण करत संपन्न झाला.प्रभानवल्ली चा पाच पालख्यांच्या भेटीचा सोहळा हा भाविकांच्या दृष्टीने पर्वणीचा दिवस ठरतो. त्यामुळे या पालखी भेटीला जिल्हाभरातून हजारो भाविक उपस्थित राहतात. खोरनिनको येथील श्री निननको देवी, प्रभानवल्ली ची वाघजाई तसेच श्री महालक्ष्मी, श्री आदिष्टी आणि श्री देव उंबरेश्वर या पाच ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या हा भेटीचा संगम होतो तो रंगपंचमीच्या दिवशी.या दिवशी प्रभानवल्ली सह संपूर्ण लांजा तालुक्यातील भाविकांनी या उत्सवासाठी हजेरी लावली होती. शनिवारी सायंकाळी पाचही ग्रामदेवतांच्या पालख्यांचे ढोलताशांच्या गजरातप्रमुख मानकरी व ग्रामस्थांसह होळीचा मांड या ठिकाणी आगमन झाले. त्यानंतर पारंपारिकपणे त्यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविक वर्गाकडून नवस बोलणे तसेच नवस फेडण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या कार्यक्रमानंतर पालखी नाचवण्यास प्रारंभ झाला. पाच पालख्यांच्या या जत्रोत्सवात भाविकांच्या आनंदाला उधाण आले होते .www.konkantoday.com