
दळण दळताना सुरक्षिततेसाठी तोंडाला बांधलेल्या ओढणीने केला घात ,गळफास लागल्याने महिलेचा मृत्यू
___दापोली- दाभोळ येथे दळण दळताना सुरक्षिततेसाठी तोंडाला बांधलेल्या ओढणी मशीन मध्ये अडकल्याने एका महिलेच्या मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे घरातील पिठाच्या गिरणीत दळण दळताना तोंडाला बांधलेली ओढणी गिरणीच्या पट्टयात अडकून महिलेच्या गळ्याला फास लागला या दुर्घटनेत त्या महिलेचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. ही घटना दाभोळ-तेलीवाडी (ता. दापोली) येथे शुक्रवारी घडली. राजेश्री राजेंद्र राऊत (४५) असे महिलेचे नाव आहे. राजेश्री राऊत यांच्या घरामध्ये सागर फ्लोअर मिल नावाची पिठाची गिरणी आहे. शुक्रवारी सायंकाळी ९:४५ वाजण्याच्या दरम्यान त्या गिरणीत दळणाचे काम करत होत्या.दळणाचे पीठ नाकात किंवा तोंडात जाऊ नये यासाठी त्यांनी तोंडाला ओढणी बांधली होती. दळण दळण्याचे काम करत असताना त्या खाली वाकल्या आणि त्यांच्या तोंडावरील ओढणीचा काही भाग गिरणीच्या पट्टयात अडकला. पट्ट्याच्या अतिवेगामुळे ओढणी जोरात ओढली गेली आणि त्यांच्या गळ्याभोवती फास लागला. हा फास एवढ्या जोरात आवळला गेला की, त्यांच्या श्वासच बंद झाला आणि त्यांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. www.konkantoday.com