
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे तरूण भारत उद्योग समूहाचे प्रमुख किरण ठाकूर यांना डी.लीट
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने तरूण भारतचे समूह प्रमुख सल्लागार संपादक तथा लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांना डी.लीट पदवी जाहीर करण्यात आली आहे.येत्या ६ एप्रिल रोजी ४० व्या पदवीदान समारंभात डी. लीट पदवीने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड तसेच फोर्ब्स मार्शलचे सहअध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स यांनाही डी.लीट पदवी प्रदान केली जाणार आहे.www.konkantoday.com