आंबेरी पोलिस चेक पोस्ट येथे २००० जिलेटीनच्या जिवंत कांड्या ( सुपर ९० ) आणि १००० डेटोनेटर जप्त

विजयदुर्ग पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेरी पोलिस चेक पोस्ट येथे २००० जिलेटीनच्या जिवंत कांड्या ( सुपर ९० ) आणि १००० डेटोनेटर अशी अनुक्रमे ३४००० हजार आणि ११००० रूपये किंमतीचे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले.विजयदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली. २२ तारखेला सायंकाळी सात वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. देवेंद्रसिंग रतनलाल राठोड ( वय २६ वर्षे , राहणार भोपालगड, भिलवडा , राजस्थान ) व ड्रायव्हर मुकेशकुमार लालूराम पंवार ( राहणार भिलवडी, राजस्थान ) हे त्यांचे XUV 500 आरटीओ नंबर RJ – 06 UD 0377 या चारचाकी वाहनामध्ये तुळसणी, तालुका संगमेश्वर ( देवरूख, जिल्हा रत्नागिरी ) येथून त्यांच्या वडिलांच्या मालकीच्या चार भुजा इंटरप्राईजेस या स्फोटक पदार्थांच्या गोडाऊनमधून 2000 जिलेटीनच्या जिवंत कांड्या आणि १००० डेटोनेटर असे एकूण ४५००० हजार रुपयांचे स्फोटक पदार्थ ब्लास्टींग ट्रेक्टरला देण्यासाठी देवगडला जात असताना बेकायदा विनापरवाना वाहतूक करताना मिळून आल्याने स्फोटक पदार्थ अधिनियम प्रमाणे ही कारवाई करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button