
रत्नागिरी शहरातील शिवखोल येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलिसां कडून अटक
लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा रत्नागिरी पोलीस ॲक्शन मोड वर आले असून अमली पदार्थ विरोधी कारवाईस प्रारंभ झाला आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहरातील शिवखोल येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून गांजा, रोख रक्कम, डिजिटल काटा, दुचाकी असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार 22 मार्च रोजी सायंकाळी 5.25 वा. करण्यात आली.सलमान नाजीम पावसकर (35,रा.निवखोल आदमपूर, रत्नागिरी ), मुजीब बिलाल चाऊस (48,रा.राजीवडा, रत्नागिरी ) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे दोघेही शिवखोल रोड येथील मेस्त्री हायस्कुलच्या कंपाऊंडच्या बाजूला गांजा विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना मिळून आले. www.konkantoday.com