
किरण सामंत यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबला, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत यांची उमेदवारी घोषित करण्यासाठी जसजसा उशीर होत आहे, तसतशी समर्थक कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढत आहे. भय्याशेठच्या उमेदवारीला विरोध तरी कोणाचा, नेमकं कोण खोडा ालत आहे, असा प्रश्न आता समर्थक उपस्थित करीत असून लवकरात लवकर याबाबत निर्णय व्हावा अशी मागणीदेखील केली जात आहे. समर्थक कार्यकर्त्यांनी आता प्रचारालाही सुरूवात केली आहे. त्यामुळे किरण सामंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहतेला देखील प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरूद्ध महायुती, असा थेट सामना यावेळी होणार आहे. परंतु जागा वाटपाचा तिढा दोन्ही बाजूला कायम असल्याने उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यास विलंब होत आहे. तरीदेखील महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार निश्चित झाले असून त्यांनी प्रचारालादेखील सुरूवात केली आहे. मात्र महायुतीचे सर्व निर्णय दिल्ली दरबारी होत असल्याने अद्याप काही जागा व उमेदवारीबाबत अनिश्चितता कायम राहिली आहे.www.konkantoday.com