अभिनेते सचिन पिळगावकरांसह दिग्गज रत्नागिरीत, रत्नागिरी रेल्वे स्थानकात चित्रिकरण

तब्बल १९ वर्षापूर्वी नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने प्रेक्षकांवर मोठी मोहिनी घातली होती. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर नवसाचा बाहुला घेवून आले होते. पण या चित्रपटाचा पार्ट २ च्या चित्रिकरणाचा शुभारंभ रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे मंगळवारी सुरु झाला. यावेळी सचिन यांच्यासोबत अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हातातील गणेशमूर्ती पाहून हे चित्रीकरण पाहणार्‍यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कलाविश्‍वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं आणि आता नवरा माझा नवसाचा-२ चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button