
फडवणीस तुला सांगतो तुझा खासदार आणि आमदार राज्यात निवडून येऊ देणार नाही.-मनोज जरांगे पाटील
मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. बीडमधील वडवणी येथील सभेमध्ये बोलताना त्यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही, असा धमकीवजा इशाराज मनोज जरांगे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना दिला आहेमी वडवणी मधूनजाहीर आव्हान करतो, तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर यांचे 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही. फडवणीस तुला सांगतो तुझा खासदार आणि आमदार राज्यात निवडून येऊ देणार नाही. दुसरे कुणीही निवडून द्या पंरतु यांचा कोणीही निवडणून येऊ द्यायचा नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.www.konkantoday.com