
धनिकांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी कोकण सिडकोच्या ताब्यात, खा. विनायक राऊत यांचा आरोप
दिल्लीश्वरांच्या आदेशाने कोकण किनारपट्टीवरील हजारो एकरात परराज्यातील धनिकांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी पर्यटन, कोकण विकासाच्या नावाखाली संपूर्ण किनारपट्टी गद्दार शिंदे मंत्रिमंडळाने सिडकोच्या ताब्यात दिली आहे. रिफायनरी, पालघरमधील वाढवण बंदराला होणारा विरोध मांडून काढण्यासाठी भाजपची ही नवी चाल आहे. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह महाविकास आघाडीमार्फत सोमवार दि. ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शासन अधिनियमाची होळी केली जाणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तर सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जावून अधिसूचनेची होळी करू असा इशारा खा. राऊत यांनी दिला आहे.www.konkantoday.com