
चिपळुणातील मचूळ व खारट पाण्याचा प्रश्न पालकमंत्री उदय सामंत यांनी लावला मार्गी
चिपळूण शहरातील मचूळ व खारट पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळूणवासियांना दिले होते. यासंदर्भात रविवारी रत्नागिरी येथे महत्वपूर्ण बैठक घेत हा प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. शहरातील गांधारेश्वर येथून पाणी उचलून ते पेठमाप, गोवळकोट व गोवळकोट रोड येथील नागरिकांना पुरविले जाणार आहे. यासाठी नगर पालिकेकडून अडीच कोटी रुपये तर शासनाकडून साडेसात कोटी असे एकूण दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीसाठी शिवसेनेचे युवा नेते नूतन शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी विशेष पाठपुरावा केला. या योजनेला आज सोमवारी प्रशासकीय मान्यता मिळून तातडीने त्याची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. www.konkantoday.com