
आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते-आमदार योगेश कदम
लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे.शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी मोठा दावा केला आहे. आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. ही गोष्ट एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मला माहिती आहे. तेव्हा एकनाथ शिंदेंनी आम्हाला दोघांना बाजूला घेऊन विचारले होते की काय करायचे?, भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत. तेव्हा भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही मांडली होती, असं योगेश कदम यांनी सांगितले. स्वतःचे कसे खरे आहे हे रेटून न्यायचे आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त भास्कर जाधव यांना काही येत नाही, अशी टीका योगेश कदम यांनी केलीwww.konkantoday.com