
पावसाळ्यात कोकण रेल्वेच्या सुरक्षितेसाठी ६०० कर्मचारी तैनात.
पावसाळ्यात कोकण रेल्वेची सेवा सुरक्षित रहावे यासाठी कोकण रेल्वेने विविध उपाययोजना केल्या आहेत. यासाठी सहाशेच्यावर कर्मचारी गस्त घालणार अाहेत.कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक ठिकाणी चोवीस तास सुरक्षा रक्षकही तैनात करणेत येणार आहे. मुसळधार पाऊस, दरड कोसळणे इत्यादी कारणामुळे पावसाळ्यात लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वेग मंदावतो यासाठी कोकण रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्यात आली आहेत. गाड्यांचा वेगही कमी करण्यात येणार आहे गार्ड व लोको पायलटला वॉकीटॉकी देणार आहेत.बेलापूर, रत्नागिरी मडगावमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.