
मिरकरवाडा पाठोपाठ उद्यमनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून ६६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला
_रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा पाठोपाठ उद्यमनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून ६६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला, ही घटना १९ ते २५ फेब्रुवारी दरम्यानच्या काळात घडली. मुसेब मकसूद बुडये (३०, रा. पडवेकर कॉलनी, उद्यमनगर रत्नागिरी) यांनी या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुडये यांचे उद्यमनगर पडवेकर कॉलनी येथे घर आहे. १९ ते २५ फेब्रुवारी २०२४ या काळात चोरट्यांनी घराच्या खिडकीची स्लायडींग काच चोरट्यांनी सरकवून आतमध्ये प्रवेश केला. तसेच कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले दागिने चोरून नेले, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये २ तोळे वजनाचा सोन्याचा हार, ६ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील टॉपची जोडी, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील छोटी रिंग जोडी आदींचा समावेश आहे. www.konkantoday.com