
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २८ रोजी रत्नागिरीत
भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याच अनुषंगाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रत्नागिरीत येत आहेत.२८ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकारी यांना सावंत मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० वाजता होणार्या मेळाव्याला रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यातील बुथ प्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली.www.konkantoday.com