
*लांजाचे सुपुत्र, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाच्या लोकपालपदी नियुक्ती*
____लांजा तालुक्यातील बेनी बुद्रूक गावचे सुपुत्र तथा न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची नुकतीच देशाचे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. बेनी बुद्रूक येथील ग्रामस्थांसह संपूर्ण लांजा तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या निवडीनंतर बेनी बुद्रूक येथील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची एप्रिल २००२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आणि नंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयात गेले. मे २०१६ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. जिथे त्यांनी जुलै २०२२ मध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत ६ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.www.konkantoday.com