चिपळुणात ऑनलाईन २ लाखांची फसवणूक*

*प्रमोशनसाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, असे सांगून येथील एकाची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. चिपळूण शहरातील पाग येथील निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था संकुलात राहणार्‍या एकाला १६ व १७ जानेवारीला अज्ञाताने एच. आर. नेहा मोबाईल क्रमांकावरून तीन युट्यूब चॅनेलच्या लिंक पाठवल्या व प्रमोशनसाठी सबस्क्राईब करण्यास सांगितले. त्याच्या मोबदल्यात फिर्यादीला १५१ रुपये मिळणार असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी तसे करून स्क्रिनशॉट अज्ञाताच्या व्हॉटसअप ग्रुपवर पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांची खासगी माहिती विचारली व क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून वाढीव रक्कम मिळण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांची १ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button