*डिजीटल जाहिरातींबाबत नवे धोरण , खोट्या आणि फसव्या जाहिरातदारांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाणार*

_सध्या देशात खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केले जात आहे. ही कामे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी देशातील माध्यमांनी आपली भूमिका बजावली पाहिजे. प्रसारमाध्यमांनी आता पुढे जाऊन विश्वासार्हता जपत तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून राष्ट्र उभारणीत आपली भूमिका बजावली पाहिजे. डिजीटल जाहिरातींबाबत नवे धोरण आणण्यात येणार असून खोट्या आणि फसव्या जाहिरातदारांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाणार आहे.दिल्लीत डीएनपीएने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ठाकूर म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात खोट्या बातम्या टाळण्याची गरज आहे. यामुळे माध्यमांची विश्वासार्हता कमी होते. मीडियाच्या नावाखाली काही लोकांकडून अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. त्यामुळे देश आणि समाजाच्या हितावर परिणाम होतो. मात्र, गंभीर परिस्थितीत मीडिया आपली भूमिका सकारात्मकपणे बजावण्यात यशस्वी ठरत असल्याचे सांगत त्यांनी माध्यमांचे कौतुकही केले.अनुराग ठाकूर म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाने काही लोकांना त्यांच्या भविष्याची काळजी वाटते, परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाने काम सुधारते असे आतापर्यंतचे अनुभव दर्शवतात. टीव्हीच्या आगमनानंतरही वर्तमानपत्रांचे महत्त्व कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे डिजिटल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनाचाही नकारात्मक परिणाम होणार नाही. आपल्या कामात देशाचे महत्त्व राहिले पाहिजे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button