
*रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे प्रौढाचा पाय घसरुन नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू*
_रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील नदीवर प्रातर्विधी करण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना सोमवार 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास उघडकीस आली.सुर्यकांत महादेव पाचकर (55,रा.सोमेश्वर सतिवाडी,रत्नागिरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.सोमवारी सकाळी ते घराच्या बाजुलाच असलेल्या नदीवर नैसर्गिक विधी करण्यासाठी गेले होेते.ते बराचवेळ झाला तरी घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना सुर्यकांत पाचकर नदीत बुडालेल्या अवस्थेत दिसून आले.त्यांना पाण्यातून बाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com




