
*दापोली ते पनवेल डी मार्ट थेट बस सेवा सोडू नये*
___दापोली व्यापारी संघटनेच्यावतीने दापोली एसटी आगार प्रमुखांना दापोली ते पनवेल डी मार्ट थेट बस सेवा सोडू नये. या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनानुसार दापोली एसटी आगार ते पनवेल डी मार्ट अशा स्वरूपाची एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता, याबाबत अशा प्रकारची कोणतीही बस सेवा सुरू करू नये.कारण यामुळे दापोली व्यापारावर विपरित परिणाम होईल. तसेच अशी बस सेवा ही तालुक्याच्या आर्थिक दृष्टीने परवडणारी नाही. सदर बससेवा सुरू करण्याचा निर्णय आपण मागे घेवून दापोली बाजारपेठ वाचवावी असे निवेदन दापोली एसटी आगार प्रमुख रेश्मा मधाळे यांना दापोलीतील व्यापार्यांनी सादर केले आहे.www.konkantoday.com