
*संप मिटला तरी रत्नागिरी तालुक्यातील या गावातील अंगणवाडी बंदच*
____रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी-लोहारवाडी येथील अंगणवाडी सेविकांचा संप २५ जानेवारीला संपला आहे.तरीही अंगणवाडी अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. याची तातडीने चौकशी करून ती त्वरित सुरू करावी, अशी मागणी कळझोंडी येथील सेवाभावी कार्यकर्ते किशोर पवार यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अंगणवाडी सेविकांचा ४ डिसेंबर ते २५ जानेवारी या ५२ दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रात बेमुदत संप चालू होता. हा संप २६ जानेवारीला मिटला. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या नियमितपणे सुरू झाल्या; मात्र कळझोंडी लोहारवाडी येथील अंगणवाडीचे दोन कर्मचारी शासननिर्णयानुसार नियुक्त झालेले असताना अजून बंद का ठेवण्यात आली आहे, असा प्रश्न पालक व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संपाच्या कालावधीत अंगणवाडी सेविकेने अंगणवाडी इमारतीची चावी कोणाकडे जमा केली, याबाबत माहिती मिळालेली नाही. या महत्वपूर्ण प्रश्नाकडे गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार यांनी गांभीर्याने लक्ष वेधले आहे. www.konkantoday.com