
मुंबई विद्यापीठाचे जून-जुलैच्या परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेले*
_ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल वेळेत लावल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर पदवी परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत.त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पुढील अभ्यासाचे, परीक्षांचे, करिअर आणि पीएचडी प्रवेशाचे नियोजन कोलमडले आहे.विद्यापीठाला परीक्षेचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करावे लागतात. दरवर्षी लांबलेल्या निकालांमुळे विद्यापीठ चर्चेत येते. यंदा हिवाळी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या ७५ पैकी ७२ परीक्षांचे निकाल वेळेत लावल्याबद्दल विद्यापीठाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. मात्र, जून-जुलैमध्ये घेतलेल्या पदव्युत्तर पदवी परीक्षांपैकी काही परीक्षांचे मोजकेच निकाल विद्यापीठाने जाहीर केले. एमए, एमएस्सी या विद्याशाखांमधील अनेक विद्यार्थी अद्यापही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठांचा दीक्षांत समारंभ दोन दिवसांवर आला तरी निकाल जाहीर केलेले नाहीत, www.konkantoday.com