जलजीवनच्या कामात अधिकारीच ठेकेदारावर मेहरबान झाल्याची तक्रार*

  • जिल्ह्यात जलजीवनच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कामकाज होत असताना मे. प्रशांत प्रकाश लाड यांना ११० कोटींचे नियमबाह्य कामे देण्यात आल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच माहितीच्या अधिकाराखाली जिल्ह्यातील अशाच इतर ९ ठेकेदारांना त्यांच्या कंत्राट घेणयाच्या प्रमाणपत्रातील क्षमतेपेक्षा अधिक रकमेची एकूण १७६ कोटींची कामे नियमबाह्य पद्धतीने दिल्याची माहिती स्वप्निल खैर यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामातील अधिकारीच ठेकेदारावर मेहरबान असल्याचा आरोप स्वप्नील गैर यांनी केला आहे.माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खैर यांनी माहिती मिळवली व पत्रकारांना दिली. त्यानुसाार जलजीवन मिशनच्या कामात जिल्ह्यात आधी मे. प्रशांत प्रकाश लाड यांना कामाच्या क्षमतेपेक्षा नियमबाह्य पद्धतीने ११० कोटींची कामे देण्यात आल्याचे उघड झाले होते. आता जिल्ह्यात आणखीन ९ ठेकेदारांना त्यांच्या कामाच्या क्षमतेपेक्षा नियमबाह्य पद्धतीे १७६ कोटींची कामे देण्यात आली आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button