
गुहागर तालुक्यातील ब्रिटीशकालीन पूल दुरूस्तीच्या प्रतिक्षेत*
- _गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असणार्या रस्त्यावरील ब्रिटीशकालीन पूल अद्यापही दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, पुलाखालील नद्यांना पावसाळ्यात पूर येणे, असे धोके या पुलांना निर्माण झाले असल्याने अनेक पूल भग्नावस्थेकडे झुकत चालले आहेत. राज्य शासनाने अशा पुलांच्या उभारणीकडे लक्ष देवून त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी तालुकावासियांनी केली आहे. www.konkantoday.com