
मातोश्रीवरून युवासेना पदाधिकारी अजिंक्य मोरेंना बोलावणे
आमदार राजन साळवी यांच्यावर कारवाई केल्याप्रकरणी लाचलुचपतच्या अधिकार्यांबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी उबाठा गटाचे युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्यावर रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष मोबाईलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून धीर देत मातोश्रीवर भेटीसाठी बोलावले आहे.
आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे हे युवासैनिकांसह फौजफाटा घेवून रत्नागिरीत पोहचले. आमदार साळवी यांना पोलीस बँकेत चौकशीसाठी नेण्याच्या तयारीत असतानाच उपस्थित कार्यकर्ते व पोलिसांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे हे देखील आक्रमक झाले होते. या दरम्यान अधिकार्यांविरूद्ध प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष मोबाईलद्वारे मोरे यांच्याशी संपर्क साधून हुकुमशाहीविरोधात लढा देण्यासाठी पाय रोवून उभे रहा, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे. अन्यायाविरोधातील लढा कायम ठेवा, असा सल्ला देत चर्चेसाठी मातोश्रीवर बोलावल्याचे युवासेना जिल्हाधिकारी मोरे यांनी सांगितले. www.konkantoday.com