
मनोज जरांगेंचं भगवं वादळ नवी मुंबईत, आंदोलनाचा आजचा दिवस निर्णायक
एकीकडे मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू असताना, दुसरीकडे मनोज जरांगें यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे.आज त्यांच्या मार्चचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून सकाळी दहाच्या सुमारास जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
मनोज जरांगेंची नेतृत्वाखालील खमराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. सध्या मनोज जरांगे हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. काल दुपारी लोणावळ्यातुन सुरु झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरु होता. आज जरांगेंच्या या आंदोलनाचा निर्णायक दिवस माणला जातोय. कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सकाळी 5.30 वाजता नवी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर वाशी येथे त्यांची सभा होणार आहे.
www.konkantoday.com