
शिक्षकांना ओव्हरटाइम करावा लागणार; राज्यात मराठा सर्वेक्षणाला सुरूवात
राज्यात मराठा सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबईत महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे काम देण्यात आले आहे. यामुळे रुग्णालये व शैक्षणिक कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
२३ ते २५ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण चालणार असून त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे सहा दिवस प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागातील सर्वाधिक ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांना या कामाला जुंपण्यात येणार असल्यामुळे महापालिका व त्यांच्याशी संलग्न शाळांतील बहुतांश शिक्षक सर्वेक्षणाच्या कामावर जातील. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची भीती आहे.
आजपासून सर्वेक्षण सुरू करण्याची जाहिरात राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यभरातील शिक्षक, मुख्याध्यापकांकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचा सर्वे केला जाणार आहे.
www.konkantoday.com