
चिपळुणातून तीन हजार मराठे मुंबईला जरांगेंच्या आंदोलनाला जाणार
चिपळूण तालुक्यातून सुमारे तीन हजार मराठ्यांची नोंदणी झाली असून मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात हे सर्व मराठे जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक, उद्योजक प्रकाश देशमुख यांनी दिली.
मराठा क्रांती मोर्चा चिपळूणची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी शिवजयंतीही उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याबाबतही नियोजन करण्यात आले. मनोज जरांगे-पाटील यांचे दि. २० जानेवारीपासून मुंबई येथील राज्यव्यापी ांदोलन सुरू होत असून दि. २६ जानेवारी रोजी ते नवी मुंबईत पायी चालत येतील व लाखोंच्या संख्येने मराठे त्यांच्यासोबत असतील. मनोज जरांगे पाटील यांच्या गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी जे आंदोलन सुरू आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी कोकणातील विशेष करून चिपळूण तालुक्यातील जवळपास तीन हजार मराठ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती राज्य समन्वयक प्रकाश देशमुख यांनी दिली. दि. २६ तारखेपर्यंत येथील मराठे मुंबईत जातील, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
www.konkantoday.com