
दापोलीचा पारा घसरला ९.५ अंश सेल्सिअसवर
यावर्षी हिवाळा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच दापोलीचा पारा मंगळवारी ९.५ अंश सेल्सिअसपर्यंत घरसला आहे. यामुळे आंबा, काजू बागायतदार सुखावले आहेत.
गेेेेेेेेेेले काही दिवस दापोलीच्या पार्यात चढ उतार सुरू होते. मात्र सोमवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळपासून थंडगार वारे वाहत होते. यामुळे सायंकाळी ६ वाजल्यापासून थंडीचे प्रमाण वाढले होते. मंगळवारी दापोलीचा पारा १२.४ अंश सेल्सिअसवरून ९.५ अंश सेल्सिअसवर घसरला, यामुळे दापोलीकर चांगलेच गारठले.
मंगळवारी कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस असल्याची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केली आहे.
www.konkantoday.com