
गणपतीपुळे येथील गणपती मंदिरानजिकच्या विश्रामगृह इमारतीसमोरील समुद्र परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील गणपती मंदिरानजिकच्या विश्रामगृह इमारतीसमोरील समुद्र परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याने सध्या पर्यटक भक्तांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.
येथे येणार्या सर्वच पर्यटकांच्या खाजगी गाड्या या गणपतीपुळे येथील स्मशानभूमी पार्किंगमध्ये पार्क केल्या जातात. त्यामुळे दर्शन घेवून परत जाणारे पर्यटक-भाविक समुद्र किनार्यावर बांधलेल्या संरक्षण भिंतीच्या पायर्यांवरून ये-जा करतात. तसेच नेक पर्यटक, भाविक याच ठिकाणाहून गणपतीपुळे मंदिराकडे ये-जा करतात. परंतु याच ठिकाणाहून ये-जा करताना सर्वच पर्यटक व भाविकांना अत्यंत घाणीच्या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागतो. www.konkantoday.com