
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे मानधन दोन महिने रखडले
रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे मानधन दोन महिने रखडले आहे. १५ जानेवारीपर्यंत हे मानधन न मिळाल्यास १६ जानेवारीपासून ही सेवा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला असून रूग्णसेवा थांबल्यास त्याला चालक जबाबदार राहणार नसल्याचे पत्र संबंधित आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १०२ रूग्णवाहिका गेली १९ वर्षे अहोरात्र २४ तास विनाअपघात सेवा देत आहेत. त्यांचे नोव्हेंबर ते डिसेंबर असे गेले दोन महिने मानधन रखडले आहे. मात्र यामुळे रात्रंदिवस रूग्णवाहिकेवर सेवा बजावणार्या चालकांना याचा मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाकडून येणारे अनुदान कधी वेळेत येत नाही. मात्र ते आले की, आरोग्य विभाग ठेकेदाराला वर्ग करते. तत्पूर्वी ठेकेदाराने स्वतःच्या खिशातून वेतनाची रक्कम रूग्णवाहिका चालकांना देणे बंधनकारक असल्याचा नियम आहे. मात्र काही ठेकेदारांकडून तसे होत नाही. www.konkantoday.com