
भाजप, विधानसभा अध्यक्ष आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री यांची मॅच फिक्सिंग- संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
“भाजप, विधानसभा अध्यक्ष आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री यांची मॅच फिक्सिंग झाली आहे. अध्यक्षांचा आजचा निर्णय हा फक्त औपचारिक आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची भेट ही मॅच फिक्सिंगसाठीच होती. त्यामुळेच पंतप्रधान दौऱ्यावर येत आहेत, शिवाय मुख्यमंत्री शिंदे आगामी दौरे करत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज (दि.१०) माध्यमांशी ते बोलत होते.
शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील तब्बल चार महिन्यांच्या कामकाजानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. पात्र-अपात्रतेचा निकाल जाहीर होणार असल्याने अध्यक्षांच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com