
फटाके फोडताना जरा जपून, फटाक्यामुळे आग लागण्याचे राज्यात अनेक प्रकार
राज्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. काल लक्ष्मीपूजन होतं. राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. फटाके फोडण्यासाठी घालून दिलेल्या वेळ मर्यादेच सर्रास उल्लंघन करण्यात आलं.दरम्यान राज्याच्या वेगवेगळ्या भागात आग लागण्याच्या घटना घडल्या. भिवंडीत आगीचे सत्र सुरू असून भिवंडी शहरातील मार्केट परिसरात मिराकल मॉलच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक दुकानात मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की, या आगीमुळे इलेक्ट्रिक दुकानासहीत युनानी दवाखाना, कपड्याचे दुकान अशी चार दुकानं आगीत जळूनखाक झाल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळतात स्थानिकांनी तात्काळ इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या व तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु तोपर्यंत या आगीत चार दुकानं जळून खाक झाली होती. आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
नाशिकच्या मेनरोड रेड क्रॉस सिग्नल परिसरात असलेल्या वर्धमान या कपड्याच्या शोरुमला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे 10 हून अधिक बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आली. पण आत्ता पर्यंतलागून असलेली 3 हून अधिक दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली. येवल्यातील नाकोडा फॅशन ड्रेसेस दुकानाला भीषण आग. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक. शर्थीचे प्रयत्न करुन अग्निशामक दलाने ही आग विझवली. आग भीषण असल्याने स्थानिक नागरिकांची ही आग विझवण्यासाठी मदत केली. आगीचे कारण अस्पष्ट आहे. फटाक्याच्या आतिषबाजीमुळे आग लागल्याची जोरदार चर्चा.
आहे
www.konkantoday.com