
सावंतवाडी येथून आपल्या घरात काहीही न सांगता रेल्वेने निघालेल्या बालकाला चिपळूण पोलिसांनी अखेर चिपळूण रेल्वेस्टेशन येथे ताब्यात घेतले.
सावंतवाडी येथून आपल्या घरात काहीही न सांगता रेल्वेने निघालेल्या बालकाला चिपळूण पोलिसांनी अखेर चिपळूण रेल्वेस्टेशन येथे ताब्यात घेतले. त्याबाबत सावंतवाडी पोलिस व त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.घरात कोणालाही न सांगता बालक निघून गेला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला; परंतु त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सावंतवाडी पोलिसांना या संदर्भात खबर देण्यात आली होती. सावंतवाडी पोलिसांनी त्याचे लोकेशन तपासले असता ते चिपळूणमध्ये आढळून आले. त्यामुळे चिपळूण पोलिस ठाण्यात याची माहिती देण्यात आली.
पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ हेडकॉन्स्टबेल शेटकर व माणके यांना चिपळूण रेल्वेस्टेशनवर रवाना केले. पोलिसांनी रेल्वेस्टेशनवर त्याचा शोध घेतला असता बालक आढळून आला. चिपळूण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. सावंतवाडी पोलिसांना याबाबत माहितीदेखील दिली आहे.
www.konkantoday




