
चिपळूण पोलिसांनी गांजाविरोधी मोहीम अधिक कडक केली
चिपळूण पोलिसांनी गांजाविरोधी मोहीम अधिक कडक केली आहे. शहरातील टपऱ्यांची झाडाझडती करण्याची मोहीम सुरु आहे. शहरातील उघडा मारुती मंदिर येथे एका बेकरीची तपासणी करण्यात आली.
शहरासह तालुक्यात गांजा विक्रीप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी आठजणांवर कारवाई केली. या कारवाईनंतर गुहागरात १ किलो ३९० ग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला होता, तर रत्नागिरी शहरातील कर्ला परिसरात ४२ ग्रॅमचे ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले होते. चिपळूण शहर परिसरातील सर्व ठिकाणे दिवस-रात्र गस्त घालून तपासण्यात येत आहेत
www.konkantoday.com




