
रत्नागिरी शहर परिसरात आठवडा बाजार येथे टपर्या चालकांचे अतिक्रमण
रत्नागिरी शहर परिसरात आठवडा बाजार येथे सध्या रस्त्याकडेला नगर परिषदेच्या जागेत टपरी व्यवसायाला दिली ओसरी आणि मालक हातपाय पसरी अशी अवस्था सुरू आहे. टपरीसाठी जागा मिळताच त्या ठिकाणी अतिक्रमणाचा पसारा वाढवायचा व त्यातून दामदुप्पट भाडेआकारणीचा नवा फंडा संबंधितांकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
शहरात सध्या अनेक ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणे वाढली आहेत. फेरीवाले, टपरी व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी आपले बस्तान मांडल आहे. त्यातून त्या विक्रत्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण अनेकजणांनी या फिरत्या व्यवसायाच्या नावावर नवा फंडा सध्या सुरू केला आहे. रस्त्याकडेला मोक्याच्या आणि सोयीच्या जागा पाहून त्या ठिकाणी टपरी उभारणी केली जाते. एकदा तेथे ओसरी मिळाली की पुढे हळुहळू हातपाय पसरायला सुरूवात होते. तशी स्थिती अनेक भागात सुरू असल्याचा आक्षेप येथील नागरिकांतून घेण्यात येत आहे. नगर परिषद अशा व्यावसायिकांकडून कर रूपाने नाममात्र आकारणी करत असते. पण त्या टपरीधारकांकडून त्याहीपेक्षा अनेक पटीने भाडेआकारणीचा नवा फंडा अवलंबण्यात येत आहे.