
देवरूख तहसीलमधील स्वच्छतागृह बंद
देवरूख तहसील कार्यालयातील कृषी विभागालगत असलेले स्वच्छतागृह गेले वर्षभर बंद अवस्थेत आहे. यामुळे कर्मचार्यांसह तालुक्याच्या कानाकोपर्यातून येणार्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे अधिकारीवर्गाने तत्काळ लक्ष देवून हे स्वच्छतागृह कार्यान्वित करावे अशी मागणी होत आहे.
देवरूख हे संगमेश्वर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पंचायत समिती, तहसील, बांधकाम आदी सर्वच शासकीय कार्यालये देवरूख येथे आहेत. सर्व विभाग एकाच छताखाली यावेत, नागरिकांची ससेहोलपट होवू नये, यासाठी तहसील कार्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे.
विविध विभाग असल्याने या कार्यालयात दररोज शेकडो ग्रामस्थांची कामानिमित्त वर्दळ असते. यातील कृषी विभाग कार्यालयालगत स्वच्छतागृह आहे. वर्षभर हे स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे. दरवाजावर स्वच्छतागृह बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. www.konkantoday.com