अनुदान वितरणामुळे ग्रंथालयांची एक महिना आधीच दिवाळीउमेश कुळकर्णी; शिंदे फडणवीस सरकारचे आभार


रत्नागिरी : ग्रंथालय संचालनालयाने ई- प्रशासनाकडे पाऊल टाकले आहे. राज्यातील १०,१३२ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीद्वारे सहाय्यक 60% वाढीव अनुदानासह वितरण केले आहे. यामुळे ग्रंथालयांची अनुदान प्राप्त झाल्यामुळे यावेळी कर्मचाऱ्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे. वेळेत आलेल्या अनुदानामुळे काम करण्यासाठी अधिक उत्साह प्राप्त होत आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने ग्रंथालयांसाठी हा उत्तम निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी व्यक्त केली.

ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथालय कार्यकर्ते यांनी अतिशय आनंद व्यक्त केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालयाने विकसित केलेल्या ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीद्वारे राज्यातील ग्रंथालयांना ७७ कोटी ७० लाख २५ हजार ७४० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. एका क्लिकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतददा पाटील यांच्या उपस्थितीत ही रक्कम ग्रंथालयांच्या बॅंक खात्यात जमा झाली आहे.

याबाबत बोलताना उमेश कुळकर्णी म्हणाले,आधीच्या काळात ग्रंथालयांचे अनुदान वेळेवर पोहोचत नव्हते. त्यामुळे प्रत्येक वेळी शासन दरबारी संपर्क साधावा लागे, प्रसंगी आंदोलनाचे हत्यारही हाती घ्यावे लागले होते. यापूर्वी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय स्तरावरून त्या त्या जिल्ह्यातील शासनमान्य कार्यरत ग्रंथालयांना सहाय्यक अनुदान पारंपरिक पद्धतीने केले जात होते. परिणामी राज्यातील ग्रंथालयांना एकाच वेळी अनुदान मिळत नव्हते, विलंब व्हायचा. ग्रंथालयाच्या कामकाजाची एकत्रित माहिती मिळत नव्हती. परंतु आता मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहनाने ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली.

ग्रंथालयांना युजर आयडी व पासवर्ड देण्यात आले आहेत. ज्याद्वारे लॉगिन करून ग्रंथालयांचा अहवाल, आवश्यक माहिती ग्रंथालये सहज भरू शकतात. अनुदान वितरण झाल्याची माहिती ग्रंथालयास एसएमएसद्वारे मिळेल. ग्रंथालयांच्या कामकाजाची माहितीसुद्धा एकाच क्लिकवर मिळणार असून मनुष्यबळ व वेळेची बचत होऊन कामकाजात गतीमानता आली. यामुळे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील यांचे उमेश कुळकर्णी यांनी आभार मानले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button