
रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरीत डेंग्युच्या रुग्णाची वाढ
रत्नागिरी जिल्ह्यासह रत्नागिरीत डेंग्युच्या रुग्णाची वाढ होत आहे
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात डेंग्युची लक्षणे असणार्या रूग्णांची संख्या वाढते आहे. रूग्णालयात दररोज येणार्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण हे डेंग्यूचे रूग्ण असल्याचे आढळत आहे. पावसाळ्यानंतर साचलेल्या पाण्यात वाढणार्या मच्छरांमुळे हा आजार झपाट्याने फैलावत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे. मात्र आता या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी औषध पुरवठा आणि रूग्णांसाठी बेडची व्यवस्था, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
साधारणतः पावसाळ्यानंतर साचलेल्या पाण्यात पैदास होणार्या डासामुळे डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढते आहे. जिल्हा रूग्णालयात बाह्यरूग्ण विभागात येणार्या रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे असणार्यांची संख्या जास्त आहे. गेल्या ३ महिन्यांतील डेंग्यूची आकडेवारी पाहता ही संख्या दुपटीने वाढत असल्याचे दिसत आहे. www.konkantoday.com