
सततच्या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडतय, प्रवासी हैराण
कोकण रेल्वे मार्गावरील कडवई-रत्नागिरी विभागादरम्यान मंगळवारी मालमत्ता देखभालीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या ३ तासांच्या मेगाब्लॉकने ७ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले. तिरूअनंतपुरम-वेरावल एक्स्प्रेस अडच तास विलंबाने धावली. अन्य ६ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली
०२१९७ क्रमांकाची कोईमतूर-जबलपूर एक्स्प्रेस १ तास तर १०१०४ क्र. ची मडगाव-सीएसएमटी १०१०५ क्र. ची. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस २ तास तर १०१०६ क्र. ची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास १० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. १२०५२ क्र. ची मडगांव-सीएसएमटी जनशताब्दी १ तास १५ मिनिटे तर १६३३७ क्र. ची ओखा एक्स्प्रेस १ तास उशिराने रवाना झाली. २२१४९ क्रमांकाची एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसही १ तास विलंबाने धावली.
www.konkantoday.com