
प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूकमतदान ४ नोव्हेंबर ला होणार
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी ची सन २०२३ -२०२८ ची स्थगित झालेली निवडणूक आज जाहीर झाली असून १६ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान शनिवारी ४ नोव्हेंबर तर मतमोजणी व निकाल ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ५२०० मतदार आपला कौल देणार आहेत.
विद्यमान संचालक मंडळ १० मे २०१७ रोजी अस्तित्वात आहे होते. कोरोना महामारी मुळे सर्वच सहकारी संस्था निवडणुका पुढे गेल्याने सत्ताधारी संचालक मंडळाला मे २२ पासून आपोआप मुदतवाढ मिळाली होती.
५ जून २०२३ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार १६ जागांसाठी तब्बल १०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ते सर्व वैध ठरले होते. २३ जुलै रोजी होणारी निवडणूक सहकार खात्याच्या २८ जून च्या आदेशानुसार ३० सप्टेंबर पर्यंत स्थगित झाली होती.
यावेळी सत्ताधारी महायुती पॅनेल व महापरिवर्तन सहकार आघाडी यामध्ये रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. महापरिवर्तन सहकार आघाडीचे सर्व १६ उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र विद्यमान सत्ताधारी पॅनेलकडून खेड तालुका, जिल्हा सर्वसाधारण व महिला राखीव उमेदवार निवडीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही.
अर्ज माघारी २५ ऑक्टोबर तर निशाणी वाटप २६ ऑक्टोबर रोजी आहे.
www.konkantoday.com