भर पावसात रत्नागिरी करांवर पाणीटंचाईचे संकट, शीळ धरणातील जॅकवेल कोसळली


भर पावसात रत्नागिरी करांवर काही दिवसाकरिता पाणीटंचाईचे संकट आले आहे तसेच दोन दिवस पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे रत्नागिरी
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅक वेल कोसळण्याचा प्रकार घडला आहे सुदैवाने ही जॅक वेल कोसळताना त्या ठिकाणी काही कामगार उपस्थित होते मात्र त्यांनी प्रसंग वधान दाखवून बाजूला झाल्याने ते त्यातून वाचले आहेत. आता नवीन जॅक वेल चालू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून पानवलं धरणातून व एम आय डी सी कडून पाणी घेऊन त्याचा पुरवठा शहराला केला जाणार आहे. उद्या दुपारपर्यंत शहराला पाणी देण्याचे प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी बाबर यांनी आज पहाटे जॅक वेल कोसळल्याचे कळताच नगर पालिका अधिकारी व कर्मचारी तातडीने शीळ धरणाकडे रवाना झाले नवी जॅक वेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली तरी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हेच उद्योग मंत्री असल्याने एमआयडीसी कडून काही प्रमाणात शहराला पाणी उपलब्ध होऊ शकेल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button