
मातृमंदिर गोकुळ बालगृहाचा समानतेचा मोरया
चंद्रावर यान पोहोचलं पण पृथ्वीवरच्या स्त्री सुरक्षेचं काय? या विषयावरील स्त्री सुरक्षेची थीम घेवून मातृमंदिर गोकुळ बालगृहाचा समानतेचा मोरया-२०२३ गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पर्यावरणपूरक समजावट लक्षवेधी ठरली आहे. या मुलींनी दरवर्षी प्रमाणे शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार केली आहे. तीन दिवस हा उत्सव या मुलींनी साजरा करून अनाथांच्या नाथा तुज नमो म्हणत आशीर्वाद घेवून स्त्री रक्षणाच्या सुरक्षेची सदबुद्धी लोकांना दे अशी प्रार्थना केली.
समानतेचा गणेशोत्सव साजरा करताना स्लोलगनमधून समाजाला संदेश देणारी सजावट केली आहे. चंद्रावर यान गेले. मात्र पृथ्वीवरच्या युवती, महिलांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न या मुलींनी विचारला आहे. प्रत्येकवेळी मुलींनाच नियम सांगितले जातात, पण ज्यांच्याकडून अत्याचार होत आहे त्या वर्गाला मुलींनी गणेशोत्सवानिमित्त १८ संदेश दिले आहेत. ज्यामध्ये मुलीचा आदर करा, मुलींना सहानुभूतीऐवजी समानता द्या, मुलगी पण माणूस असते, कपड्यांवरून स्त्रियांचे संस्कार काढू नका, अशा पद्धतीच्या संदेशांच्या समावेश आहे. सजावटीसाठी टाकावू वस्तूंचा वापर करून टाकावूतून टिकावू असा संदेश दिला आहे.
www.konkantoday.com