
रायगड कोलाड रेल्वे सुरक्षारक्षक हत्येप्रकरणी एकास अटक
कोकण रेल्वे मार्गावर रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वेस्थानकानजिकच्या तिसे गावाच्या रेल्वे फाटक येथे कार्यरत सुरक्षारक्षक चंद्रकांत सदू कांबळे यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या प्रकरणी फरारी मेव्हण्यास अखेर रायगड पोलिसांनी अक्कलकोटमधून गजाआड केले. विजय रमेश शेट्टी याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. बहिणीसाठी दहा लाखांची पोटगी मागितल्यानेच त्यांनी हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून दोन रिव्हॉल्वरही जप्त केले.
रोहा तालुक्यातील पोलखुर्द येथे वास्तव्यास असलेले चंद्रकांत कांबळे २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ड्युटीवर जेवण करत असतानाच अज्ञाताने त्यांच्या डोक्यात गोळी घालून हत्या केली होती. www.konkantoday.com