सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीमार्फतफरारे, परचुरी फेरीबोट पुन्हा सुरू


सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीमार्फत १४ सप्टेंबरपासून दापोली तालुक्यातील फरारे व गुहागर तालुक्यातील परचुरी या दोन गावांच्या दरम्यान फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा पावसाळ्यात बंद ठेवण्यात आली होती.
गुहागर तालुक्यातील प्रवाशांनी परचुरे-फरारे-वाकवली पिसई-मंडणगड -आंबेत गोरेगाव या मार्गाने मुंबईकडे जाण्यासाठी प्रवास केल्यास वेळ व अंतर याची बचत होईल. तसेच वाकवली परिसरातील ५० गावातील प्रवाशांनी रत्नागिरीकडे जाण्यासाठी फरारे-परचुरी- शृंगारतळी -आबलोली रत्नागिरी या मार्गावरून प्रवास केल्यास तो सुखकर होणार आहे. पर्यटक व स्थानिक प्रवाशांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन चेअरमन डॉ. चंद्रकांत मोकल, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश मोकल यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button