
आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी दापोलीत १० सप्टेंबरला सायकल फेरी
आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो*. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल मोकळेपणाने बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते. आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांची काही लक्षणे ओळखून त्यांचे जीवन वाचवले जाऊ शकते. याबद्दल जनजागृती करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि जेसीआय दापोली तर्फे रविवारी, १० सप्टेंबर २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती उपजिल्हा रुग्णालय, एसटी आगार, पोलीस स्टेशन, बाजारपेठ, फॅमिली माळ, बुरोंडी नाका, केळस्कर नाका, आझाद मैदान अशा ६ किमी मार्गावर असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान आत्महत्येबद्दल जागरुकता आणि ती रोखण्यासाठीचे प्रयत्न याविषयक तज्ज्ञ जाणकारांचे माहितीपूर्ण सेशन होतील. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क ९६३७९२०९२०, ८७६७२१९६१० करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
www.konkantoday.com